Kolhapur MNC Jobs Saam Tv
naukri-job-news

Kolhapur MNC Jobs : कोल्हापूरकरांना महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १०वी पास ते पदवीधर करु शकतात अर्ज; जाणून घ्या

Kolhapur Municipal Corporation Recruitment: कोल्हापूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. कोल्हापूर महानगरापालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

कोल्हापूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.पब्लिक हेल्थ मॅनेजर, एपिडेमियॉलॉजिस्ट, अर्बन क्वालिटी अशुरन्स कोऑर्डिनेटर, लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स, हेल्थ वर्कर पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२४ आहे. पब्लिक हेल्थ मॅनेजर पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी प्राप्त असावी. एपिडेमियॉलिस्ट पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकल ग्रॅज्युएट असावे. (Kolhapur MNC Job)

अर्बन क्वालिटी अशुरन्स कोऑर्डिनेटर पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकल ग्रॅज्युएट (MBBS/BUMS/BHMS/BDS) (MPH/MHA/MBA In Health Care Administration) पदवी असावी. लॅब टेक्निशियन पदासाठी उमेदवाराने १२ वी पास आणि DMLT प्रमाणपत्र असावे. स्टाफ नर्स पदासाठी नर्सिंगचा कोर्स केलेला असावा.

कोल्हापूर महानगरपालिकेतील या भरतीसाठी अर्ज मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नावे, ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत,भाऊसिंग रोड, सी-वार्ड कोल्हापूर येथे अर्ज पाठवायचा आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. (Kolhapur Mahanagarpalika)

या नोकरीबाबत सर्व माहिती https://web.kolhapurcorporation.gov.in/recruitmentPage# या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी पगार पदानुसार असणार आहे. १८००० ते ३२००० रुपये पगार दिला जाणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेदेखील भरती

सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत वॉर्ड निरिक्षक पदासाठी भरती जाहीर केली आहे. पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांना ९१००० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT