NFL Recruitment Saam Tv
naukri-job-news

NFL Recruitment: शिक्षण पूर्ण झालंय, पण नोकरी नाही; मॅनेजमेंट ट्रेनीसाठी आहे बंपर भरती; लगेच करा अर्ज

NFL Recruitment 2024: तुमचे शिक्षण पूर्ण झाले आहे पण नोकरी मिळत नाहीये तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. नॅशनल फर्टिलाइझर्स लिमिटेडने बंपर भरती जाहीर केली आहे. मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी ही भरती आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडने (National Fertilizers Limited Recruitment) बंपर भरती जाहीर केली आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडने मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार अर्ज करु शकणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला Nationalfertilizers.com या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जुलै २०२४ आहे. त्यामुळे त्याआधीच अर्ज करा.

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेजने १६४ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी आहे. भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार B.Tech/B.E/B.sc असणे गरजेचे आहेत. त्याचसोबत इंजिनिअरिंग पदवी/MBA/MCA/PG Degree/PG Diploma उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १८-२७ वर्ष असावे.

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला एक वर्ष ट्रेनिंग दिले जाईल. यासाठी त्याला ४० हजार ते १ लाख ४० हजार रुपये पगार दिला जाईल. या पदासाठी उमेदवाराला परीक्षा द्यावी लागले. OMR आधारित ऑफलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिकेसाठी आजपासून शिंदेंच्या शिवसेनेच्या मुलाखती

Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले, प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा 22k अन् 24k गोल्डच्या आजच्या किंमती

Diabetes First Symptom: डायबेटिसचं पहिलं लक्षण दिसतं आपल्या डोळ्यात, नेमके काय बदल होतात? वाचा सविस्तर

Health Tips : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या ५ गोष्टी कराच, आरोग्य राहिल उत्तम

SCROLL FOR NEXT