ISRO Recruitment Saam Tv
naukri-job-news

ISRO Recruitment: ISRO मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी सुरु आहे भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

ISRO Aprrentice Recruitment: इसरोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इसरोमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इसरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. इसरोमध्ये ग्रॅज्युएट, अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्ही इसरोच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला याबाबत सर्व माहिती मिळेल. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ७ ऑगस्ट २०२४ पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२४ असणार आहे.

या पदासाठी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी उमेदनवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंग (B.E.Mechanical/Civil/Computer/IT/Electrical) डिप्लोमा पास केलेला असणे गरजेचे आहे. टेक्निशियन पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंग (E&TC/Mechanical/Civil/Computer/IT/Electrical) डिप्लोमा पास असणे गरजेचे आहे.

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ बोर्डातून १०वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये IT (NTC/SCT) पास असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या अप्रेंटिस पदासाठी अर्ज करु शकतात. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना ९००० रुपये पगार, टेक्निशीयन अप्रेंटिस पदासाठी ८००० रुपये पगार तर ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ७७०० रुपये पगार देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी २७ ऑगस्ट २०२४ आधी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : २०० रूपयात वीकेंड करा एन्जॉय, पालघरमधील 'या' ठिकाणांना भेट द्याच

IPL मध्ये खेळू दिले नाही, RCB चा स्टार खेळाडू थेट कोर्टात गेला; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : पुण्यात पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला; ६५ जण जखमी

KDMC : केडीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड, महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप; वरिष्ठ लिपिक निलंबित

Chanakya Niti: नोकरीत यश मिळवायचंय? चाणक्यांचे हे अनमोल विचार नक्की वाचा, मिळेल घवघवीत यश

SCROLL FOR NEXT