Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: भारतीय रेल्वेत तब्बल ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती;१२वी पास उमेदवार करु शकतात अर्ज;जाणून घ्या सविस्तर

Railway Recruitment 2024: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. रेल्वे एनटीपीसीमध्ये तब्बल ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

रेल्वे भरती बोर्डात नॉन टेक्निकल पदांसाठी भरती सुरु आहे. ११५८८ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.यातील काही पदे ग्रॅज्युएटसाठी तर काही पदे अंडरग्रॅज्युएट तरुणांसाठी आहे.

या भरतीमध्ये ८११३ पदे ही ग्रॅज्युएट तरुणांसाठी आहे तर ३४४५ अंडर ग्रॅज्युएट पदांसाठी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची सुरुवात १४ सप्टेंबरपासून होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२४ आहे.

या नोकरीसाठी अंडरग्रॅज्युएट पदासाठी १२ वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.ग्रॅज्युएट पदासाठी वयोमर्यादा १८ ते ३६ वर्ष आहे. तर अंडरग्रॅज्युएटसाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. rrbapply.in या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल.

याबाबत अधिक माहिती काही दिवसांत देण्यात येणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे करण्यात येणार आहे. त्यानंतर तुमची अजून टेस्ट घेण्यात येईल.

याचसोबत अनेक बँकामध्ये भरती करण्यात येणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. बँकेमध्ये नेहमी भरती करण्यात येणार आहे. बँकेच्या नोकरीसाठी परीक्षा द्यावी लागते. आयबीपीएसद्वारे ही भरती करण्यात येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सहल बेतली विद्यार्थ्यांच्या जीवावर, दिवेआगर किनाऱ्यावरील निष्क्रिय यंत्रणेचे 8 बळी

विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी महाआघाडीत फूट; काँग्रेसला मित्रपक्षानेच दिलं आव्हान

सर्व सरकारी बँका दर शनिवारी बंद राहणार? बँकांचे सरकारी नोटिफिकेशन व्हायरल

दुष्काळामुळे लाडकी बहीणसह 26 योजनांवर टांगती तलवार; सरकार अॅक्शन मोडवर

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्या शिंदेचे वाहन गुन्हे शाखेकडून जप्त

SCROLL FOR NEXT