Indian Oil Job Saam Tv
naukri-job-news

Indian Oil Jobs: फ्रेशर्स आहात? इंडियन ऑइलमध्ये सरकारी नोकरीची संधी; १७०० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Indian Oil Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. फ्रेशर्ससाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १७०० अप्रेंटिस पदांसाठी भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

फ्रेशर्स आहात आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. जर तुमचे शिक्षण झाले असेल तर इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. १०वी,१२वी पास, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (Indian Oil Recruitment)

इंडियन ऑइलमधील (Indian Oil Job) या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ३ मेपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून आहे. एकूण १७०० पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

इंडियन ऑइलमधील ही नोकरी ट्रेड अप्रेंटिस पदासाठी आहे. ऑपरेटर फिटर, टेक्निशियन अशा विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. १०वी पास आयटीआर/12वीं/ग्रेजुएट/ डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.ग्रेजुएशन/बी.ए/बीएस.सी/बीकॉम डिग्रीप्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे काही स्किल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी तुम्ही वेबसाइटवर जाऊन पात्रता चेक करु शकतात.

इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २४ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला स्टायपेंड मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कागदपत्रे पडताळणीद्वारे होणार आहे. यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना बोलवण्यात येईल. उमेदवारांना अर्ज करण्याआधी NAPS/NATS पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

कपडे ठेवताना तुम्हीही करताय का 'ही' मोठी चूक? कपाट खराब होण्याआधी आजच जाणून घ्या सोप्या टिप्स

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

फडणवीसांनी त्यांना सोडलं तर समजायचं त्यांचाच हात आहे! व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे पाटलांचा थेट इशारा

Dry Fruits Buying Tips: मिठाईऐवजी ड्रायफ्रूट्स आवडीने खाताय? थांबा, बाजारात आला बनावट सुकामेवा, असं ओळखा खरं काजू-बदाम

SCROLL FOR NEXT