Indian Oil Recruitment Saam Tv
naukri-job-news

Indian Oil Recruitment: इंडियन ऑइलमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार १,४०,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Indian Oil Recruitment 2025: इंडियन ऑइल या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइलमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइलच्या या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

इंडियन ऑइलमध्ये फायनान्स वर्कसाठी असिस्टंट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२५ आहे.

इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.

या नोकरीसाठी उमेदवारांना पगार त्यांच्या पदानुसार मिळणार आहे. या नोकरीसाठी ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत उमेदवारांना महागाई भत्ता आणि इतर भत्ते देण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड CA/CMA इंटरमीडिएट परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. याचसोबत ग्रुप डिस्कशन आणि ग्रुप टास्कनंतर केली जाणार आहे. याचसोबत पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

स्टेट बँकेत भरती

सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँकेत एफएलसी काउंसलर आणि एफएलसी डायरेक्टर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून माघार

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT