Navy Recruitment
Navy Recruitment  Saam tv
naukri-job-news

Navy Recruitment : तरुणांसाठी खुशखबर ! भारतीय नौदलात 372 जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज

कोमल दामुद्रे

Indian Navy Recruitment : भारतीय नौदलात भरती होण्याची स्वप्न बघणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. भारतीय नौदलात काम करण्यासाठी इच्छूक असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय नौदलाने चार्जमन पदाच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे.

उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज करावा. तसेच अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही २९ मे २०२३ पर्यंत आहे. यासाठी शिक्षणाची पात्रता, फॉर्म कसा भरायचा व पगार (Salary) किती असेल हे जाणून घेऊया

1. रिक्त जागा

या भरतीसाठी एकूण 372 जागा रिक्त आहेत.

2. पदाचे नाव : चार्जमन

  • इलेक्ट्रिक ग्रुप - 42 पदे

  • वेपन ग्रुप - 59 पदे

  • इंजिनिअरिंग ग्रुप - 141 पदे

  • कंस्ट्रक्शन व मेंटेनेंस ग्रुप - 118 पदे

  • प्रोडक्शन प्लानिंग व कंट्रोल ग्रुप - 12 पदे

3. शैक्षिणक पात्रता

उमेदवाराने अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा विज्ञानातील भौतिकशास्त्रात, रसायनशास्त्रात किंवा गणित या विषयांपैकी एक विषय म्हणून बॅचलर पदवी असणे आवश्यक.

4. वयाची (Age) अट

अर्जदाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे असावे. अर्जदाराची वयोमर्यादा २९ मे २०२३ पासून मोजली जाईल. (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट )

5. परीक्षा फी

जनरल/ ओबीसी उमेदवारांसाठी 278

SC/ ST/ PWD/ EXSM / महिला - फी नाही

6. पगार

दरमहिन्याला ३५,४०० रुपये ७ व्या वेतनश्रेणीतील आयोगाची ६ वी लेव्हल असल्यास. याशिवाय निवडलेल्या उमेदवाराला भारतीय नौदलाच्या नियमात विविध भत्ते मिळतील.

7. कसा कराल अर्ज

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे.

  • हा अर्ज ऑनलाइन स्वरुपाचा असेल

  • अधिकृत वेबसाईटवर किंवा Joinindiannavy.Gov.In वर क्लिक करुन अधिक माहीती मिळवू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CSK Vs SRH : ऋतराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Today's Marathi News Live: आदित्य ठाकरेंचा 30 एप्रिलला श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT