Indian Coast Gurad Recruitment Saam Tv
naukri-job-news

Government Job: दहावी पास अन् महिना ८१ हजार पगार, इंडियन कोस्ट गार्डमध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर

Indian Coast Gurad Recruitment: १०वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन कोस्ट गार्डमध्ये विविध पदांसाठी सध्या भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन कोस्ट गार्डमध्ये विविध पदांसाठी भरती जाहर करण्यात आली आहे.इंडियन कोस्ट गार्ड रिजन इस्टमध्ये इंजिन ड्रायव्हर, फायरमॅन, एमटीएस, एमटी फिटर अशा अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

इंडियन कोस्ट कार्डमधील या नोकरीबाबत अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. indiancoastguard.gov.in वर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात.

सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत इंडियन कोस्ट गार्डमध्ये ही भरती केली जाणार आहे. इंजिन ड्रायव्हर ते मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वीची परीक्षा दिलेली असावी. याचसोबत डिप्लोमा/अप्रेंटिस / आयटीआय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८००० ते ८११०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग चेन्नई, विशाखापट्टणम या ठिकाणी केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे.(Indian Coast Guard Job)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अधिकृत वेबसाइटवरुन फॉर्म डाउनलोड करुन घ्यावा. त्यानंतर द कमांडर, कोस्ट गार्ड रीजन, नेपियर ब्रिजच्या जवळ, चेन्नई येथे अर्ज पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT