Indian Bank Recruitment Google
naukri-job-news

Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत नोकरीची संधी;१७१ पदांसाठी भरती जाहीर, आजच अर्ज करा

Indian Bank Recruitment 2025: इंडियन बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती

१७१ पदांसाठी केली जाणार भरती

बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. दरम्यान, इंडियन बँकेत सध्या नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. १७१ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीची जाहिरात इंडियन बँकेद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी ही जाहिरात वाचावी.

स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती

इंडियन बँकेत स्पेशलिस्ट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती वेगवेगळ्या विभागात केली जाणार आहे. त्यामुळे रिक्त पदांसाठी पात्रता वेगवेगळी असणार आहे.बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदवी प्राप्त केलेली असावी किंवा मास्टर्स केलेले असावे. याचसोबत बी.ई/B.Tech/CA/M.Sc/MBA/PGDM/MCA/MS/ICSI पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत त्यांना कामाचा अनुभव असावा. या नोकरीसाठी भरती ही संपूर्ण भारतात होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७ रुपये शुल्क भरायचे आहे.

पगार

या नोकरीसाठी तुम्हाला https://www.indianbank.bank.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२५ आहे.या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ६४,८२० रुपये मासिक पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी २३ ते ३६ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. ऑनलाइन सीबीटी टेस्टबाबत माहिती तुम्हाला लवकरच दिली जाईल. या नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad : सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कलर स्प्रे मारून घरफोडी; पिंपरी चिंचवड शहरातील घटना

Maharashtra Live News Update: मालेगावात देवी विसर्जनासाठी गेलेला तरुण नदी पात्रात बेपता

Breakup Tips: प्रेमात फसवणूक झाल्यानंतर स्वतःला कसं सांभाळाल? 'या' टीप्स नक्कीच करतील तुमची मदत

Belly Fat : वजन कमी करायचंय? मग डाएट कशाला? जेवणात करा या मसाल्याचा वापर

Shocking: सासरच्या छळाला कंटाळली, तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली; पोलिसाच्या बायकोच्या आत्महत्येमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT