Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; ३४४ रिक्त जागा; पात्रता अन् पगार किती? जाणून घ्या

India Post Payment Bank Recruitment: पोस्ट ऑफिसच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. तब्बल ३४४ रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत ३४४ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे.याबाबत अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (India Post Payment Bank Recruitment)

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेतील या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांने कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे गरजेचे आहे. त्याचसोबत GDS म्हणून कामाचा दोन वर्षाचा अनुभव असायला हवा.त्यामुळे ज्या उमेदवारांनी याआधी पोस्ट ऑफिसमध्ये काम केले आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३०,००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची सुरुवात ११ ऑक्टोबर २०२४ पासून झाली आहे. दरम्यान अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला www.ippbonline.com या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. (India Post Payment Bank Job)

अन्न व औषध प्रशासन विभाग भरती

याचसोबत सध्या राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरी करण्याची चांगली संधी आहे. ५६ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT