India Infrastructure Recruitment Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती; पात्रता काय? जाणून घ्या

India Infrastructure Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडिया इन्फ्रास्टक्चरमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्समध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

इंडिया इन्फ्रास्टक्चर ही सरकारी कंपनी आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही iifcl.in वर जाऊन अर्ज करावेत. (Government Job)

या भरती मोहिमेत शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असावा. २१ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

या भरती मोहिमेत ४० जागा रिक्त आहेत. त्यात जनरलसाठी १२ पदे रिक्त, प्रोजेक्ट फायनान्सिंग, स्ट्रेस असेट मॅनेजमेंटसाठी ४ पदे रिक्त आहेत. रिसोर्स अँड ट्रेजरी पदासाठी २ जागा रिक्त आहे. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीसाठी २ जागा रिक्त आहेत.ह्युमन रिसोर्ससाठी २ पदे रिक्त आहे. रिसर्च अँड अॅनालिसिस पदासाठी १ जागा रिक्त आहे. (India Infrastructure Job)

असा करा अर्ज (How To APPLY)

या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जाऊन रिक्रूटमेंट सेक्शनवर जा. त्यानंतर

Click Here For New registration वर क्लिक करा. त्यानंतर सर्व माहिती भरा. यानंतर फोटो अपलोड करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, याचा गैरसमज आम्ही #@$ डू नाही - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT