Income Tax Bharti Saam Tv
naukri-job-news

Income Tax Job: आयकर विभागात नोकरीची संधी; पगार २ लाख रुपये; पात्रता काय? जाणून घ्या

Income Tax Recruitment 2025: आयकर विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आयकर विभागात सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आयकर विभागात २८ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (Income Tax Recruitment)

आयकर विभागात असिस्टंट डायरेक्टरस अॅडिशनल डायरेक्टर, डायरेक्टर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला incometaxindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. त्यानंतर तिथे दिलेल्या डायरेक्टर असिस्टंट डायरेक्टर भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अर्जाचा नमुना दिसेल. (Income Tax Job)

यानंतर तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे. हा फॉर्म भरुन डायरेक्टरेट ऑफ इन्कम टॅक्स, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स, ग्राउंड फ्लोर, नवी दिल्ली ११० ०५५ येथे पाठवायचा आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमटेक पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी उमेदवारांचे वेतन अनुभवानुसार असेल. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७८८०० ते २,०९,२०० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमटेक पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी उमेदवारांचे वेतन अनुभवानुसार असेल. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७८८०० ते २,०९,२०० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT