IIT Bombay Job Saam Tv
naukri-job-news

IIT Bombay Job: IIT मुंबईत नोकरी अन् १,७७,५०० रुपये पगार; कोणत्या पदासाठी भरती? जाणून घ्या सविस्तर

IIT Bombay Recruitment: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयआयटी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयआयटी मुंबई येथे सध्या भरती सुरु आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ऑफिसर ते मेकॅनिक अशा अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे.

आयआयटी मुंबई येथे टेक्निकल ऑफिसर, मेडिकल ऑफिस, स्पोर्ट्स ऑफिसर, टेक्निकल सुपरिटेंडेंट, ज्युनियर इंजिनिय, ज्युनियर टेक्निशयन आणि ज्युनियर मेकॅनिक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०२४ आहे.

आयआयटी मुंबई येथे २८ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.https://www.iitb.ac.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

आयआयटी मुंबई येथे टेक्निकल ऑफिसर पदासाठी उमेदवारांना ५६१०० ते १७७५०० रुपे वेतन मिळणार आहे. तसेच मेडिकल ऑफिसर पदासाठी ५६१०० ते १७७५०० वेतन मिळणार आहे.टेक्निकल सुपरिटेंडेंट पदासाठी ३५४०० ते ११२४०० रुपये वेतन मिळणार आहे. ज्युनियर मेकॅनिक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २१७०० ते ६९१०० रुपये वेतन मिळणार आहे.

या नोकरीबाबत सविस्तर माहिती iitb.ac.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गासाठी काही जागा ठेवल्या आहेत. इच्छुक उमेदवारंनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बँक ऑफ बडोदा भरती (Bank Of Baroda Recruitment)

सध्या बँक ऑफ बडोदामध्ये सध्या भरती सुरु आहे. ५९२ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.कॉन्ट्रॅक्ट पोस्ट (मॅनेजर व इतर पदे) यांसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारानी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT