IBPS RRB Recruitment Google
naukri-job-news

IBPS RRB Recruitment: बँकेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १३००० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

IBPS RRB Recruitment 2025: रिजनल रुरल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुच्याकडे आहे. आयबीपीएसद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. क्लर्क ते पीओ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. सरकारी बँकेत क्लर्क ते पीओ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने भरती जाहीर केली आहे. क्लर्क ते पीओ पदांसाठी ही भरती होणार आहे.

आयबीपीएसद्वारे १३००० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रिजनल रुरल बँकेत ही भरती केी जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२५ असणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.ibps.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

आयबीपीएसद्वारे ऑफिसर स्केल आणि ऑफिस असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षेद्वारे होणार आहे. प्रिलियम्स परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे.

पात्रता

या नोकरीसाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ऑफिसर ए ऑफिसर स्केल १,२,३ पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी ऑफिसर पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. ऑफिसर स्केल लॉ पदासाठी लॉ डिग्री प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी तुम्हाला आयबीपीएसच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला www.ibps.in वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर होमपेजवर CRP for RRBs दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर जाऊन अप्लाय Apply Online for CRP-RRBs Officers वर क्लिक करा.

यानंतर रजिस्ट्रेशन करा.

त्यानंतर लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर सर्व महत्त्वाची माहिती भरा.

तुमची सही आणि फोटो अपलोड करा.

यानंतर शुल्क भरुन अर्जप्रक्रिया पूर्ण करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT