IBPS PO Recruitment Saam Tv
naukri-job-news

IBPS PO Recruitment: बँकेच्या परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! IBPS PO साठी अर्ज करण्याची मुदत वाढली

IBPS PO Recruitment Application Deadline Extended: आयबीपीएसद्वारे दरवर्षी प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भरती केली जाते. यावर्षीही इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे.

Siddhi Hande

राष्ट्रीय बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. देशातील ११ राष्ट्रीय बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती दरवर्षी केली जाते. यावर्षी आयबीपीएसअंतर्गत भरतीसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ होती. मात्र, आता अर्ज करण्याची मुदतवाढ करण्यात आली आहे. २८ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

IBPS POच्या ४४५५ जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.IBPS PO द्वारे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि कॅनरा बँक अशा एकूण ११ राष्ट्रीय बँकांमध्ये ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

आयबीपीएस भरतीमध्ये उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रिलियम परीक्षा अन् मुख्य परिक्षेद्वारे केली जाणार आहे.त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीमध्ये पास झाल्यावर उमेदवारांची नेमणूक केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT