IB Recruitment Saam Tv
naukri-job-news

IB Recruitment: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरीची संधी, पगार १,४२,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

IB Recruitment 2025; इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. एक्झिक्टुिव्ह पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी विभागात चांगल्या पदावर नोकरी करण्याची संधी तरुणांकडे आहे. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये सध्या भरती जाहीर केली आहे. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये ३७१७ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिसूचनादेखील जाहीर करण्यात आली आहे.

इंटेलिजेंस ब्युरोमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १९ जुलैपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२५ पर्यंत असणार आहे. (Intelligence Breau Recruitment)

या नोकरीसाठी उमेदवारांनी गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर www.mha.gov.in जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे.

असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड २/एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती केली जाणार आहे. लेव्हल सी पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी विविध प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

इंटेलिजेंस ब्युरोमधील या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावे. तसेच कॉम्प्युटरचे ज्ञानदेखील असावे.

पगार आणि वयोमर्यादा

या नोकरीसाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल ७ नुसार ४४,९०० ते १,४२,४०० रुपये पगार मिळणार आहे. याशिवाय इतर अनेक भत्तेदेखील दिले जातील.

निवड प्रक्रिया

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.यामध्ये दोन टप्प्यांमध्ये परीक्षा होतील. पहिला पेपर हा करंट अफेअर्स, जनरल नॉलेज,रिझनिंग, इंग्रजी विषयांसाठी होणार आहे. तर दुसरा पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : "हनुमान चालीसा म्हटली अन्.." फ्लायदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार पीएम मोदींशी संवाद साधताना झाले भावुक; पाहा Video

Mumbai Politics: मोठी बातमी! मुंबईत मनसेच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Rajgira Laddu Recipe : नवरात्रीत उपवासाला खा टेस्टी राजगिरा लाडू; प्रोटीनसह मिळेल दिवसभराची एनर्जी, रेसिपी १० मिनिटांत तयार

Maharashtra News Live Update: मंगळवेढ्यात दुष्काळाची दाहकता; आमदार समाधान आवताडेंकडून नुकसानग्रस्त गावांची पाहणी

Blood vessel health: प्लाक जमा होऊन रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यात? या 5 ड्रिंक्सने लगेच वितळेल चरबी

SCROLL FOR NEXT