High Court Bharti Saam TV
naukri-job-news

High Court Bharti 2024: दहावी पास तरुणांना हायकोर्टात नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ९२००० रुपये मिळणार पगार, अर्ज कसा कराल?

Hight Court Recruitment 2024 Application Process: उच्च न्यायालयात रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे. या भरतीमध्ये १० वी पास उमेदवार अर्ज करु शकणार आहे. या पदासाठी २९,२०० रुपये ते ९२,३०० पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

तुम्ही १० वी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. मुंबई उच्च न्यायालयात आणि नागपूर खंडपीठात भरती सुरु आहे. रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती राबवण्यात आली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. १० वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर उच्च न्यायालयात रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यासाठी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयात सरकारी विभागात ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सरकारी नोकरी हवी असेल तर नक्की अर्ज करा. या नोकरीसाठी १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. वाहनचालक या पदासाठी ही भरती केली जात आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २९,२०० रुपये ते ९२,३०० रुपये वेतन दिले जाणार आहे.

या भरतीसाठी २१ ते ४३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवार कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे. उमेदवाराला मराठी आणि हिंदी भाषा येणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे मोटर चालवण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे जवळपास किमान ३ वर्ष हलके किंवा जड वाहन चालवण्याचा अनुभव असावा. उमेदवाराचा वाहन चालवण्याचा रेकॉर्ड चांगला असावा. चारचाकी वाहनाची किरकोळ दुरुस्ती करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. एकूण ८ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर आहे. निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. त्याची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. त्यानंतर या नोकरीसाठी त्याची निवड केली जाईल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जुलै २०२४ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Deool Band 2 Collection : IPL च्या धामधूमीतही 'देऊळ बंद 2' चा डंका; प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची तुफान क्रेझ, कमाईचा आकडा कितीवर पोहचला?

Myanmar Blast : शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५५ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी; पाहा नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध रिलस्टार झाली हिरोईन, स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार 'श्रद्धा पवार', कोण आहे ही अभिनेत्री? पाहा तिचे फोटो

Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT