UIDAI Job Saam Tv
naukri-job-news

UIDAI Job: सरकारी नोकरी अन् १ लाख ७० हजार रुपये पगार; UIDAI मध्ये भरती सुरु; अर्ज कसा अन् कुठे करायचा?

UIDAI Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यूआयडीएआयमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

Job Opportunity in UIDAI: प्रत्येकालाच चांगल्या पगाराची नोकरी करायची असते. जर तुम्हीही नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.या नोकरीबाबत अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. (UIDAI Recruitment)

UIDAI मध्ये उपसंचालक आणि वरिष्ठ लेखाधिकारी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवाराला १ लाख ७० हजार रुपये पगार मिळणार आहे. (Government job)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्ष असावी.या नोकरीसाठी ७व्या वेतन आयोगानुसार पगार देण्यात येणार आहे. उपसंचालक पदासाठी ६७ हजा ७०० ते २ लाख ८० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. तर वरिष्ठ लेखाधिकारी पदासाठी ५६ हजार ते १ लाख ७७ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यानंतर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा लागेल. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडा.त्यानंतर अर्ज लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. (UIDAI Recruitment 2024)

तुम्हाला अर्ज भरुन संचालक (एचआर), युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, ब्लॉक वी, पहिला मजला,हाउसफेड कॉम्प्लेक्स, दिसपूर, गुवाहाटी येथे पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT