SIDBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरी अन् भरघोस पगार; SIDBI मध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा?

SIDBI Recruitment: सध्या स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सीडबीमध्ये ग्रेड ए आणि ग्रेड बी ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. सिडबीमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अर्जप्रक्रिया ८ नोव्हेंबर २०२४ म्हणजेच कालपासून सुरु झाली आहे.

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने ग्रेड ए आणि ग्रेड बी ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर https://www.sidbi.in/en वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०२४ आहे. (Government Job)

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. जनरल अँड स्पेशलिस्ट स्ट्रीममध्ये ग्रेड ए आणि बी ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. २१ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. ग्रेड ही पदासाठी २५ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड फेज I,फेज II आणि मुलाखतीद्वारे सिलेक्शन केले जाणार आहे.या नोकरीसाठी ७२ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

असिस्टंट मॅनेजर (Grade A)पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कॉमर्स, इकोनॉमिक्स, गणित, स्टॅटिस्टिक्स, इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. एमबीए किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.तर मॅनेजर ग्रेड बी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. त्याच्याकडे पाच वर्षांचा अनुभव हवा.(SIDBI Recruitment 2024)

मॅनेजर ग्रेड बी (कायदा) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यात पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत मास्टर्स केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ५ वर्षांचा अनुभव असायला हवा.त ग्रेड बी आयटी मॅनेजर पदासाठी उमेदवाराने कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. (SIDBI Recruitment)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT