SAIL Job Saam Tv
naukri-job-news

SAIL Job: सरकारी नोकरी अन् १,२०,००० रुपये पगार; SAIL मध्ये भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

SAIL Recruitment 2024: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टील ऑथोरिटीमध्ये कंसल्टंट पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये कंसल्टंट पदासाठी भरती सुरु आहे.

डॉक्टर इन मेडिकल डिसिप्लिन पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही sail.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

कंसल्टंट पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६९ वर्षे असावी.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. असोसिएट फेलो ऑफ इंडस्ट्रीयल हेल्थ पदासाठी उमेदवारांना ९०००० रुपये पगार मिळणार आहे. पीजी डिप्लोमासोबत स्पेशलायझेशन केलेल्या उमेदवारांना १२०००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.इच्छुक उमेदवारांनी २६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

रेल्वेत भरती

सध्या रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी भरती सुरु आहे. ३२००० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेत विविध विभागांमध्ये भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २३ जानेवारी २०२५ पासून सुरु होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT