Government Job Saam TV
naukri-job-news

SAIL Recruitment: सरकारी नोकरी अन् १००००० रुपये पगार;SAIL मध्ये सुरु आहे भरती; जाणून घ्या सर्वकाही

SAIL Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. सरकारी नोकरी मिळवायची म्हणजे परीक्षा द्यावी लागते, असं अनेकांना वाटतं. परंतु आता तुम्ही परीक्षेशिवायदेखील सरकारी नोकरी मिळवू शकतात. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती SAIL च्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Government Job)

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये दुर्गा स्टील प्लांटमध्ये ८ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. डीएसपी, अलॉय स्टील प्लांट (एएसपी) पदासाठी भरती केली जाणार आहे. सीओसीसीसाठी २ पदे रिक्त आहे. एसएमएससाठी २ जागा रिक्त आहेत. पीसाईसाठी १ रिक्त जागा आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचावी. या नोकरीसाठी उमेदवारांनी ग्रेडनुसार पगार देण्यात येणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १,००० रुपये पगार मिळणार आहे. (SAIL Recruitment)

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६५ वर्ष असावी. या नोकरीसाठी उमेदवारांनी शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यानंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे डीजीएम (एचआर-ओडी) रुम नंबर ३, इस्ताप भवन, दुर्गापूर स्टील प्लांट, दुर्गापूर ७१३२००३, पश्चिम बंगाल येथे पाठवायचा आहे. (Steel Authority Of India)

आरबीआयमध्ये भरती (RBI Jobs)

सरकारी नोकरी करायची असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्येही सध्या भरती सुरु आहे. मेडिकल कंसल्टंट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. एमबीबीएस पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT