ONGC Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

ONGC Recruitment: १०वी पास तरुणांसाठी ONGC मध्ये नोकरीची संधी; २२३६ पदांसाठी होणार भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

ONGC Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ओएनजीसीमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजे ओएनजीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ओएनजीसीमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (ONGC Recruitment)

ओएनजीसीमध्ये २२३६ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२४ आहे.

ओएनजीसीमध्ये एकूण २२३६ पदे भरती केली जाणार आहे. त्यातील १५९ पदे ही महाराष्ट्रात आहे. ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे आणि नोकरी शोधत आहेत. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून १०वी, १२वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर (BBA/B.Tech/B.sc)पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (Government job)

१८ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी ग्रॅज्युएट पदवीधर पदासाठी ९००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ७००० ते ८०५० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. डिप्लोमा पदासाठी ८०५० रुपये स्टायपेंड मिळणार आहे.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती (PGCIL Bharti)

सध्या पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्येही नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ८०२ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.या भरती मोहिमेत ज्युनियर ट्रेनी ऑफिसर, डिप्लोमा ट्रेनी, असिस्टंट ट्रेनी ऑफिसर पदासाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२४ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra News Live Update : डॉ. अमोल कोल्हे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आग्रही मागणी

भाच्याचा संसार मोडल्याचा प्रचंड राग! जंगलात नेऊन सासऱ्याच्या डोक्यात घातला दगड; पुण्यात हत्येने खळबळ

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! हायप्रोफाईल सोसायटीचा ११ वा मजला जळून खाक, २ जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई हादरली! मध्यरात्री ३ ते ४ घरांवर दरड कोसळली; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ८जण ढिगाऱ्याखाली

SCROLL FOR NEXT