NTPC Recruitment Saam tv
naukri-job-news

NTPC Recruitment: NTPC मध्ये सरकारी नोकरी अन् १,४०,००० रुपये पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

NTPC Recruitment 2025: एनटीपीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ट्रेनी इंजिनियरिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एनटीपीसीमध्ये इंजिनियर पदासाठी भरती सुरु आहे. चांगल्या कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

एनटीपीसीमध्ये इंजिनियरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. य नोकरीसाठी तुम्ही ntpc.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

एनटीपीसीमधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी १३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत. या भरती मोहिमेत ४७५ रिक्त पदे भरली जाणार आहे. (NTPC Recruitment 2025)

एनटीपीसीमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंगमध्ये ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे.B.E./B.Tech. पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

एनटीपीसीमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २७ वर्षे असावी.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. (NTPC Job)

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई बत्ता आणि इत्तर भत्ते दिले जाणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची GATE-2024 स्कोरच्या आधारे केली जाणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये भरती

सध्या पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय टपाल विभागात स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०२५ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रम्प यांनी ओकली भारताविरोधात गरळ, ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT