NTPC Recruitment Saam tv
naukri-job-news

NTPC Recruitment: शिक्षण पूर्ण झालंय? सरकारी नोकरीची संधी; NTPC मध्ये भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

NTPC Recruitment 2024: नुकतेच शिक्षण पूर्ण झालंय आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. एनटीपीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एनटीपीसीमध्ये असोसिएट पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एनटीपीसीमध्ये सध्या असोसिएट पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. एनटीपीसी लिमिटेडमध्ये असोसिएट (कॉर्पोरेट इंजिनियरिंग फंक्शन) पदासाठी भरती केली जाणार आहे. (NTPC Recruitment)

या नोकरीसाठी उमेदवारांनी ntpc.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

एनटीपीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित इंजिनियरिं डिसिप्लिमध्ये BE/B Tech/M Tech पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कमीत कमीत ५ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. (NTPC Recruitment 2024)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६२ वर्षे असावी.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन गुगल फॉर्ममध्ये तुमची सर्व माहिती भरुन अर्ज करायचे आहे. या नोकरीबाबत अधिसूचना आणि गुगल फॉर्मची लिंक अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कामाचा अनुभव आणि योग्यतेनुसार केली जाणार आहे.

अग्निवीरवायू भरती (Agniveervayu Bharti)

सध्या भारतीय हवाई दलात अग्नीवीरवायू पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ७ जानेवारी २०२५ पासून सुरु होणार आहे. या भरती मोहिमेत इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अग्निवीरवायू पदासाठी भरती ही ४ वर्षांसाठी होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १२ वी पास केलेली असावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Epstein Files: 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' लवकरच उघडणार, सेटवरून पहिला फोटो समोर; भोंदू खरातच्या भूमिकेत कोण?

Smart Meter : महाराष्ट्रात स्मार्ट मीटरचा धडाका; तब्बल १.५ कोटींहून अधिक ग्राहकांकडे स्थापना, पाहा A टू Z माहिती

Painkiller Side Effects : अंगदुखी असो वा ताप; वारंवार पेनकिलर खाताय? वेळीच थांबा! अन्यथा जीवावर बेतू शकतं

Maharashtra News Live Update : बारामतीतील उजनी धरणात पंचवीस टक्के पाणीसाठा वजा

Uterine infection: गर्भाशयात इन्फेक्शन झाल्यावर कोणती लक्षणं दिसतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल

SCROLL FOR NEXT