NTPC Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; NTPC मध्ये भरती सुरु; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

NTPC Recruitment 2024: तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. एनटीपीसीमध्ये सध्या ५० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सध्या भरती सुरु आहे. एनटीपीसीमध्ये असिस्टंट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. याबाबत कंपनीकडून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. (Government Job)

अधिसूचनेनुसार, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये ५० रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी careers.ntpc.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

एनटीपीसीमधील या भरतीमध्ये ५० मधील २२ पदे ही सामान्य प्रवर्गासाीट राखीव आहेत. तर इतर पदेआरक्षित प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. (NTPC Job)

एनटीपीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा सिविल प्रोडक्शनमध्ये डिग्री प्राप्त केलेली असावी. तसेच इंडस्ट्रील सेफ्टीमध्येही डिप्लोमा किंवा अॅडव्हान्स डिप्लोमा केलेला असावा. याबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (NTPC Recruitment)

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in जायचे आहे. त्यानंतर सहायक अधिकारी (सिक्युरिटी) च्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्टर करावे लागणार आहे. यानंतर फॉर्म भरा. त्यानंतर फी भरा. या फॉर्मची प्रिंट आउट तुम्ही तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

फक्त इडली-डोसा नाही! यंदा पावसाळ्यात ट्राय करा 'हे' 5 गरमागरम साऊथ इंडियन पदार्थ

Gingee Fort : जिंजी किल्ला पाहायला जाताय? मग जवळच असलेली ‘ही’ ५ स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन्स नक्की फिरा

SCROLL FOR NEXT