NTPC Recruitment Saam Tv
naukri-job-news

NTPC Recruitment: महिन्याला २ लाख पगार, NTPC मध्ये 'या' पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना भरघोस पगार मिळणार आहे.

NTPC मध्ये डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या पदासाठी २५० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.ntpc.co.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिविल आणि C&I या विषयांवरील प्रोजेक्टवर काम करण्याची संधी आहे. प्रोजेक्ट, इरेक्शन, कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया उद्या म्हणजे १४ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०२४ आहे.

NTPC मध्ये डेप्युटी मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये B.E/B.Tech पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

NTPC मध्ये डेप्युटी मॅनेजर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराचे वेतन E-4 ग्रेडमध्ये असेल. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७० हजार ते दोन लाखापर्यंत वेतन मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT