Government Jobs SAAM TV
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरी शोधताय? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये भरती सुरु, पगार ९२३०० रुपये; अर्ज कसा करावा?

NIA Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. तुम्हीही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एनआयएमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती सुरु आहे.

एनआयएमधील नोकरीबाबत माहिती nia.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु आहे.(Government Job)

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमधील या नोकरीसाठी ३३ पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचून घ्या. (National Investigation Agency Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्ष असावी.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी २९२०० ते ९२३०० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्ता, एचआरए, टीपीटी असे भत्ते मिळणार आहेत. (Sarkari Naukari)

या नोकरीबाबत माहिती एनआयएमधील अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी फॉर्म आणि कागदपत्रे एसपी(प्रशासन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली ११०००३ येथे पाठवायचा आहे.

पंजाब नॅशनल बँकेत नोकरी

सध्या पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सायकोलॉजिस्ट पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी त्याआधी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

Shocking : धक्कादायक! ९ महिन्याचं बाळ धावत्या एक्सप्रेसच्या खिडकीतून पडले, नंतर जे घडलं त्याने काळजाचा ठोका चुकला

"मेंटेनन्स देणार नाही, काय करायचं ते करा" असं म्हणणाऱ्या फ्लॅटधारकांना झटका; सोसायटी करू शकते 'ही' कडक कायदेशीर कारवाई

Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा साडीतील रॉयल लूक; पेस्टल गुलाबी-लाल साडीत दिसतेय अप्सरा

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT