National Insurance Corporation Limited Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची संधी; NICL मध्ये ५०० पदांसाठी भरती; पात्रता काय? जाणून घ्या

National Insurance Corporation Limited Recruitment: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ५०० रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. एनआसीएलमध्ये असिस्टंट (क्लास III) पदांसाठी भरती सुरु आहे. ५०० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (National Insurance Corporation Limited Recruitment)

नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही सरकारी कंपनी आहे. या कंपनीमध्ये नोकरी करण्याची चांगली संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २४ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २२०२४ आहे.

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये ५०० पदांसाठी भरती आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. पदवीधर उमेदवारांना नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करावा लागेल. इच्छुक उमेदवारांनी ११ नोव्हेंबर २०२४ पूर्वी अर्ज करावेत. (Government Job)

UIDAI भरती

सध्या UIADAI मध्ये हैदराबाद कार्यालयात भरती सुरु आहे. हैदराबाद कार्यालयात ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यूआयडीएआय कंपनी ही आधार कार्ड बनवण्याचे आणि रेगुलेट करण्याचे काम करते. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २ लाख रुपये पगार देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT