Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची संधी; कृषी विद्यापीठात भरती निघाली; पगार ८१००० रुपये; अर्ज कसा करावा?

Krushi Vidyapeeth Bharti 2025: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कृषी विद्यापीठात सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगारदेखील मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठात सध्या भरती सुरु आहे. कृषी विद्यापीठातील गट क संवर्गात भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. कृषी विद्यापीठातील या नोकरीसाठी (Krushi Vidyapeeth Bharti 2025) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कृषी विद्यापीठात (Krushi Vidyapeeth) सध्या कृषी सहाय्यक आणि इतर पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता ही अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. कृषी सहाय्यक पदासाठी २५,५०० ते ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यकतेनुसार आणि अनुभवानुसार वेतन दिले जाणार आहे.

कृषी विद्यापीठातील या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. १८ पेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. चांगल्या विद्यापीठात पर्मनंट नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

कनिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी पदवीधर आणि संबंधित क्षेत्रात डिप्लोमा केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. कृषी विद्यापीठात ७१ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे ही भरती करण्यात येणार आहे. १० एप्रिल २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपुरात वायू प्रदूषणाचा कहर; साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू

Jamun Benefits: तुम्हाला पण जांभूळ खायला फार आवडतात? मग वाचा त्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Anulom Vilom Benefits: प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास होतात? मग सकाळी १० मिनिटांसाठी करा हे सोपे योगासन

Ratnagiri: बाप्पाचं दर्शन घेऊन बीचवर मज्जा करायला गेले अन् अनर्थ घडला; ५ जणांचा बुडून मृत्यू, नावं आली समोर

Acidity : ॲसिडीटी, पोटदुखीमुळे तुमचं मुल खूप रडतंय? करा ‘हा’ घरगुती उपाय, मिनिटांत वाटेल बरे

SCROLL FOR NEXT