Indian Oil Job Saam Tv
naukri-job-news

Indian Oil Job: इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Indian Oil Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. इंडियन ऑइलमध्ये सध्या भरती सुरु आहे. इंडियन ऑइलमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइलच्या या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

इंडियन ऑइलमध्ये पार्ट टाइम डॉक्टर इन अटेंडेंस पदासाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला iocl.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे.

इंडियन ऑइलमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD (मेडिसिन), MS (जनरल सर्जरी)/MBBS डिग्री असायला हवी. याचसोबत कामाचा २ वर्षाचा अनुभव असायला हवा.

या नोकरीसाठी एमडी (MD) आणि एमएस (MS) उमेदवारांना प्रत्येक तासाला १४०० रुपये मिळणार आहे. या नोकरीसाठी ३६,४०० रुपये पगार मिळणार आहे. जर एमबीबीएस डिग्रीप्राप्त उमेदवारांना २९,३८० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज उप महाप्रबंधक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, ईआरपीएल, पाटणा, पोस्ट ऑफिस ढेलवान, बिहार येथे अर्ज पाठवायचा आहे. ज्यांचे मेडिकलमध्ये शिक्षण झाले आहे त्यांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत.

सेंट्रल बँकेत भरती

सध्या सेंट्रल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बिझनेस कॉरेस्पॉडंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०२५ आहे. २१ ते ४५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gass Cylinder: गॅस सिलिंडरचा तुटवड्यामुळे टेन्शन, इलेक्ट्रिक शेगड्यांची मागणी वाढली; खरेदीसाठी महिलांची गर्दी

BP कमी झालाय? घरीच करा हे ५ उपाय, लगेच मिळेल आराम

Maharashtra Live News Update : सौदी अरेबियातून शेनलॉन्ग जहाज मुंबईत दाखल

टेन्शन संपलं! ३२ देशांनी खजिना उघडला, तब्बल ४०० दशलक्ष बॅरल तेल बाजारात

LPG गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम पुन्हा बदलले, ग्रामीण अन् शहरी भागासाठी नवी अट

SCROLL FOR NEXT