Indian Army Job Saam Tv
naukri-job-news

Indian Army Job: बक्कळ पगार अन् इंडियन आर्मीत नोकरी करण्याची संधी; अशी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

Siddhi Hande

अनेक तरुणांचे देशसेवा करण्याचे स्वप्न असते. देशसेवेसाठी अनेकजण भारतीय आर्मीत काम करण्याचे स्वप्न पाहत असतात.जर तुम्हालाही आर्मीत नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. इंडियन आर्मीत ऑफिसर बनण्याची संधी तुमच्याकडे आहे.

इंडियन आर्मीने टेक्निकल प्रवेश योजना (TES-53) अंतर्गत जुलै २०२५ बॅचसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

इंडियन आर्मीत ९० रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. जर तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर ७ नोव्हेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुदतीपूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने फिजिक्स, केमिस्ट्री, गणित (PCM)सह १०वी आणि १२वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्याचसोबत जेईई मेन्स परीक्षा दिलेली असावी.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म २ जानेवारी २००६ ते १ जानेवारी २००९ या कालावधीत झालेला असावा.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल. त्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यानंतर मेडिकल टेस्ट केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल. (Indian Army Job)

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत सिव्हिल इंजिनियर आणि मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी १४२००० रुपये पगार मिळणार आहे. (BMC Recruitment)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

SCROLL FOR NEXT