Income Tax Bharti Saam Tv
naukri-job-news

Income Tax Recruitment: आयकर विभागात नोकरीची संधी, मिळणार १ लाख रुपये पगार, या पदासाठी भरती सुरु; जाणून घ्या

Income Tax Recruitment 2025: आयकर विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आयकर विभागात असिस्टंट पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना भरघोस पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. इन्मक टॅक्स डिपार्टमेंटमध्ये डेटा प्रोसेसिंग असिस्टंट ग्रेड बी पदासाठी भरती सुरु आहे. या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. (Income Tax Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०२५ असणार आहे. अधिसूचना प्रकाशित केलेल्या दिवसांपासून ३० दिवसापर्यंत तुम्ही अर्ज करु शकतात. म्हणजेच तुम्ही जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी तुम्ही incometaxindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या वेबसाइटवर जाऊन रिक्रूटमेंट सेक्शनवर जाऊन संबंधित अधिसूचनेच्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही अर्जाची प्रिंट आउट काढून घ्या. हा फॉर्म भरुन तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. (Income Tax Job)

या नोकरीसाठी अर्ज तुम्हाला निदेशालय आयकर (सिस्टीम), केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड, ग्राउंड फ्लोर, ई २, एआरए सेंटर, नवी दिल्ली ११० ०५५ येथे पाठवायचा आहे.

डेटा प्रोसेसिंग असिस्टंट ग्रुप बी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पे स्केल ७ नुसार पगार मिळणार आहे. ४४९०० ते १४२४०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये ८ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची पोस्टिंग दिल्ली, लखनऊ, हैदराबाद, कानपुर, चंदीगड, कोलकत्ता, चेन्नई येथे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT