ESIC Recruitment Saam tv
naukri-job-news

ESIC Recruitment: कर्मचारी राज्य विमा महांमंडळात नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

ESIC Recruitment 2024: कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. सिनियर रेजिडेंट, स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशलिस्ट पदासाठी ही भरती जाहीर केली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) पुणे येथे नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये सिनियर रेजिडेंट, स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशलिस्ट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. (Government Job)

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी वॉक इन इंटरव्ह्यूच्या दिवशी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये ५० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सिनियर रेजिडेंट पदासाठी ४० जागा रिक्त आहेत. स्पेशलिस्ट पदासाठी ८ जागा रिक्त आहेत. सुपर स्पेशलिस्ट पदासाठी २ जागा रिक्त आहेत.

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये सुपर स्पेशलिस्ट पदासाठी वॉक इन इंटरव्ह्यू १७ डिसेंबर रोजी होणार आहे. स्पेशलिस्ट पदासाठी इंटरव्ह्यू १०,११,१२, १३, १६ आणि १७ डिसेंबर रोजी होणार आहे. (ESIC Recruitment)

या भरती मोहिमेत इंटरव्ह्यूला जाताना उमेदवारांनी महत्त्वाचे कागदपत्र सोबत घेऊन जायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एमएससी/एमसीआय प्रमाणपत्र, एमएससी प्रमाणपत्र प्राप्त असणे गरजेचे आहे. तसेच याआधी सरकारी नोकरी करत असाल तर एनओसी आणि पासपोर्ट साइज फोटो घेऊन उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीच्या एक तास आधी उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे. तिथे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी BDS/MBBS/PG Diploma/MD/MS/DNB Degree असायला हवी. सिनियर रेजिडेंट अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष असायला हवे . तसेच इतर पदांसाठी कमाल वयोमर्यादा ६९ वर्ष असायला हवी. (ESIC Pune Reruitment 2024)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओव्हरटेकवरून वाद... नंतर रागाने पाहिलं, नागपूरात अभियांत्रिकी विद्यार्थ्याची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या

Albattya Galbattya Natak: कल्याणच्या नाट्यगृहाची अवस्था पाहून कलाकार संतापले; 'अलबत्या गलबत्या' कलाकारांचा व्हिडिओ व्हायरल

Thane Politics : ठाण्याच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, कारण काय?

Kalyan Crime: पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कल्याणमधील संतापजनक घटना

NEET UG Exam: नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, देशभरातून १६ संशयितांना ताब्यात

SCROLL FOR NEXT