Government Job Google
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार २ लाखांपेक्षा जास्त; पात्रता काय? अर्ज कुठे अन् कसा करावा?

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सीएसआयआरमध्ये सध्या भरती सुरु आहे. शास्त्रज्ञ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएसआयआर-भारती पेट्रोलियम संस्थेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. शास्त्रज्ञ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सीएसआयआर-आयआयपीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करायचा आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती तुम्हाला iip.res.in या वेबसाइटवर मिळेल. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ एप्रिल म्हणजे आजपासून सुरु होणार आहे.

सीएसआयआर-आयआयपीमध्ये एकूण ९ पदांसाठी भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीथ ५ मे २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखीव आहे. सामान्य प्रवर्गासाठी ४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर इतर प्रवर्गासाठी उरलेल्या जागा राखीव आहेत. एकूण ९ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे असायला हवी. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.ई/एम.टेकसोबत पीएचडी केलेली असावी.

या नोकरीसाठी उमेदवारांना ६७,७०० ते २,०८,७०० रुपये पगार मिळणार आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत सीएसआयआर संस्था काम करते. या संस्थेत जास्तीत जास्त रिसर्च होते. त्यामुळे चांगल्या संस्थेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

फ्रेशर असाल आणि करिअरची सुरुवात करायचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. तुम्ही चांगल्या सरकारी कंपनीत काम करु शकतात. या कंपनीत काम केल्याच्या अनुभवाचा तुम्हाला भविष्यातदेखील फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

IAS Transfer: तुकाराम मुंढेंची २१ वर्षांत २५ वेळा बदली, आता कुठे करण्यात आली नियुक्ती?

पुण्यासह विविध जिल्ह्यात पुढील ३ तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट', video

psl 2026 : क्रिकेट विश्वात खळबळ, बॉल टॅम्परिंगचा आरोप; फलंदाजावर २ सामन्यांची बंदी

SCROLL FOR NEXT