सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या महारत्न कंपनी कोल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चांगल्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.
कोल इंडिया लिमिटेडमध्ये ४३४ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्ही या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
कोल इंडिया लिमिटेडमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १५ जानेवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. या परीक्षेबाबत लवकरच माहिती देण्यात येणार आहे.
नोकरीसाठी अर्ज कसा करावा?
कोल इंडिया लिमिटेडच्या coalindia.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात.
वेबसाइटवर जाऊन तुम्ही Recruitment वर क्लिक करा.
यानंतर CIT Management Trainees MT Recruitment 2025 वर क्लिक करा.
यानंतर आवश्यक माहिती भरुन अर्ज भरा.यानंतर अर्जाची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.
कोल इंडियामधील नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला फी भरावी लागणार आहे. सामान्य प्रवर्गातील लोकांना ११८० रुपये फी भरायची आहे. राखीव प्रवर्गातील लोकांना कोणतीही फी भरायची नाही. कोल इंडियामध्ये विविध पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.E-3 पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ६०,००० ते १,८०,००० रुपये पगार मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.