CIDCO Job Saam Tv
naukri-job-news

CIDCO Job: सिडकोमध्ये नोकरी अन् १७१००० रुपये पगार; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

CIDCO Recruitment: सिडकोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सिडकोमध्ये अधिकारी पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिडकोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सिडकोमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे.सिडकोच्या नोकरीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (CIDCO Job)

सिडकोमध्ये सहाय्यक विकास अधिकारी, क्षेत्राधिकारी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सहाय्यक विकास अधिकारी पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि संबंधित क्षेत्रातील स्पेशलायझेशन केलेले असावी. क्षेत्राधिकारी पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. (CIDCO Recruitment)

सिडकोमधील नोकरीसाठी २९ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि शैक्षणिक पात्रतेनुसार होणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची निवड १ वर्षाच्या कालावधीसाठी होणार आहे. (CIDCO Recruitment 2025)

सिडकोमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड १ वर्षाच्या कालावधीसाठी होणार आहे. सहाय्यक विकास अधिकारी पदासाठी उमेदवारांना ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे. क्षेत्राधिकारी पदासाठी ४१,८०० ते १,३२,३०० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT