सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिडकोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सिडकोमध्ये चांगल्या पगाराची नोकरी तुम्हाला मिळणार आहे. याबाबत सिडको महामंडळाद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (CIDCO Recruitment)
सिडकोमधील या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.सिडकोमध्ये सहाय्यक विकास अधिकारी, क्षेत्राधिकारी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
सिडकोच्या या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष असावी. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. सहाय्यक विकास अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच संबंधित क्षेत्रात स्पेशलायझेशन केलेले असावे. क्षेत्राधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४१,८०० ते १,३२,३०० रुपये पगार मिळणार आहे. (CIDCO Recruitment 2024)
२९ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/cidcogjul24/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परिक्षेद्वारे करण्यात येणार आहे. या परिक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे तुमची निवड करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२५ आहे. (CIDCO Job News)
दूरसंचार विभागात भरती
सध्या दूरसंचार विभागातदेखील भरती सुरु आहे. दूरसंचार विभागात डिविजनल इंजिनियर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.४८ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. त्यातील ४ रिक्त पदे ही मुंबईत भरती केली जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.