BMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ९२००० रुपये मिळणार पगार; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. ग्रुप सी इन्स्पेक्टर पदासाठी ही भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. महानगरपालिकेत कारनिर्धारण व संकलन खात्यात निरीक्षक गट सी म्हणजे ग्रेट सी इन्स्पेक्टर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

बृहन्मुमुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. सरकारी नोकरी, चांगला पगाराची नोकरी ही सर्वांनाच करायची असते. जर तुम्हालाही सरकारी नोकरी करायच असेल तर तुम्ही महानगरपालिकेत अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत १७८ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. इन्स्पेक्टर ग्रुप सी पदासाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवीधर असणे गरजेचे आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला १००० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये फी असणार आहे. १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २० सप्टेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला २९,२०० रुपये ते ९२,३०० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. तुम्ही https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या वेबसाइटवर जाऊन संपूर्ण जाहिरात वाचू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breast Cancer Drug: ब्रेस्ट कॅन्सरच्या रूग्णाचा मृत्यू! महागड्या कॅन्सरच्या औषधासाठी तीन वर्षांत ५७ वेळा सुनावणी पुढे, आता थेट सरन्यायाधीशांना पत्र

Bhaji Recipes : झटपट भाजी बनवायचीये? 10 मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपी पाहाच

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT