Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

BDL Recruitment: सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी नक्की वाचा. भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

​BDL Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे. १५० रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये फ्रेशर पदांसाठी भरती केली जाणार आहे. ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे आणि नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

भारत डायानामिक्स कंपनी ही देशात अत्याधुनिक मिसाइल आणि सुरक्षा तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी काम करते. या कंपनीत अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्रामअंतर्गत भरती केली जाणार आहे.भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मशिनिस्ट, वेल्डर पदांसाठी भरती केली जाणार आहे. ITI उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

भारत डायनामिक्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जपप्रक्रिया ११ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करायचा आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही मेरिट बेसिसवर केली जाणार आहे. आयआयटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.या नोकरीसाठी तुम्ही bdl-india.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

रेल्वे भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी रेल्वेतदेखील काम करण्याची चांगली संधी आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेत स्काउट्स आणि गाइड्स अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी १०वी, १२ वी आणि आयआयटी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. त्यामुळे इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT