Government Job Google
naukri-job-news

AOC Recruitment: इंडियन ऑर्डिनेंस कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी, तब्बल ७२३ पदांसाठी भरती; पात्रता काय? जाणून घ्या

AOC Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑर्डिनेंस कॉर्पोरेशनमध्ये तब्बल ७२३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑर्डिनेंस कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन ऑर्डिनेंस कॉर्पोरेशनमध्ये ग्रुप सी पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

इंडियन ऑर्डिनेंस कॉर्पोरेशनमध्ये ट्रेड्समॅन मेट, फायरमॅन, ज्युनिअर ऑफिसर असिस्टंट, मटेरिअल असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०२४ आहे.

इंडियन ऑर्डिनेंस कॉर्पोरेशनमध्ये ७२३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्यातील ट्रेड्समॅन पदासाठी ३८९ जागा रिक्त आहेत. तर फारमॅन पदासाठी २४७ जागा रिक्त आहेत. तर मटेरियल असिस्टंट पदासाठी १९ जागा रिक्त आहेत. ज्युनिअर ऑफिस असिस्टंट पदासाठी २७ जागा रिक्त आहेत. (AOC Recruitment)

या नोकरीसाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. १०वी पास ते डिप्लोमाधारक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.उमेदवारांनी aocrecruitment.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचा आहे. त्यानंतर उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाणार आहे.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना देशाच्या संरक्षण व्यवस्थेत योगदान देण्याची संधी मिळते. त्यामुळे नोकरीसोबतच तुम्हाला देशसेवाही करता येणार आहे. (Government Job)

NCERT मध्ये नोकरी

सध्या NCERT मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. Educationists/Researchers या पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. NCERT रिसर्च असोसिएटशिप योजनेअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT