Maharashtra Anganwadi Job Vacancy 
naukri-job-news

Anganwadi Bharti 2024: १२ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अंगणवाडीमध्ये रिक्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Maharashtra Anganwadi Bharti 2024: अंगणवाडीत १२ वी पास उमेदवारांसाठी भरती सुरु आहे. ज्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत. अंगणवाडी मदतनीस या पदासाठी ही भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अंगणवाडीत नोकरीची सुवर्णसंधी आहे. अंगणवाडीत मदतनीस या नोकरीसाठी ही भरती सुरु आहे. या नोकरीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. १२ वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. याबाबत महिला व बाल विकासद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

राज्य सरकारअंतर्गत ही भरती केली जात आहे. अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी उमेदवार अर्ज करु शकतात. १८ ते ३५ वर्ष वयोमर्यादा या नोकरीसाठी निश्चित करण्यात आली आहे. विधवा महिलांसाठी ४० वर्ष ही वयोमर्यादा आहे.या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण ११ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. नोकरीसाठी दर महिन्याला ५,५०० रुपये वेतन दिले जाणार आहे.

नोकरीसाठी उमेदवाराची निवड त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाणार आहे. यामध्ये बारावी, पदवी, पदव्युतर,बी.एड, डी.एड, एमएससीआयटी केले असल्यास त्याची मार्कशीट अर्ज करताना देणे आवश्यक आहे.

२६ जुलै २२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरीतील रहिवास उमेदवारांनीच या नोकरीसाठी अर्ज करावेत. बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कुलकर्णी कम्पाउंड जेल रोड रत्नागिरी येथे तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT