ESIC Recruitment Saam tv
naukri-job-news

ESIC Recruitment: कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरी अन् १३१००० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या

ESIC Recruitment 2025: कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्पेशलिस्ट पदासाठी ही भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये स्पेशलिस्ट पदांसाठी भरती सुरु आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळातील या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. तुम्ही esic.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (ESIC Job)

या भरती मोहिमेत स्पेशलिस्ट पदे भरली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२५ आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ६७ वर्षे असावी.

कर्मचारी राज्य विमा महामंडळात रेग्युलर स्पेशलिस्ट पदासाठी १,३१,०६७ रुपये पगार मिळणार आहे. पार्ट टाईम स्पेशलिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ६०,००० रुपये पगार मिळणार आहे. दर आठवड्याला १६ तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्या व्यक्तीला अतिरिक्त ८०० रुपये दिले जाणार आहे. (ESIC Recruitment 2025)

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. ही मुलाखत २२ जानेवारीला होणार आहे. यासाठी तुम्हाला चिकित्सा अधीक्षक कार्यालय,ईएसआयसी हॉस्पिटल, वन्नरपेट्टई, तिरुनेलवेली येथे उपस्थित राहायचे आहे.

मुलाखतीला जाताना उमेदवारांना अर्ज आणि काही आवश्यक कागदपत्रे घेऊन जायची आहेत. या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवारांचा भरघोस पगार मिळणार आहे.

AAI मध्ये भरती

सध्या आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियामध्येही नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. प्रोग्राम हेड, यंग प्रोफेशनल, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवारांना लाखो रुपयांचे पॅकेज मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT