DRDO Recruitment 2025  saam tv
naukri-job-news

DRDO Recruitment: सरकारी नोकरीची संधी, DRDO मध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

DRDO Recruitment 2025: सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. डीआरडीओमध्ये सायंटिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डीआरडीओमध्ये सध्या नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. डीआरडीओमध्ये सध्या सायंटिस्ट बी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि मुल्यांकन केंद्र DRDO-RAC ने ही भरती जाहीर केली आहे. एकूण १५६ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर rac.gov.in जाऊन अर्ज करु शकतात.

शास्त्रज्ञ बी (Scientist B) पदासाठी भरती सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विठ्यापीठातू अंभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असावी. किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनियरिंगची बॅचलर पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच गेट स्कोअर कार्डदेखील असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्कात सूट दिली जाणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड GATE परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाईल. यानंतर शॉर्टलिस्टिंग केले जाईल. यानंतर मुलाखतीला बोलावले जाईल. त्यातून निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीसाठी बोलावले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर...

Ration Card KYC: कामाची बातमी! रेशन कार्ड केवायसी करण्याची मुदत वाढली; शेवटची तारीख काय?

Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर अन् अशोक सराफ पुन्हा एकत्र, सेटवरचा फोटो समोर

Shocking: लघवी पाजली, नाकाला बूट लावत मानेवर पाय; गैरफायदा घेत भोंदूबाबाचे अमानुष कृत्य, VIDEO व्हायरल

Weather Update : राज्यात पावसाचा ब्रेक! पुढील 5 दिवस पावसाचा जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज | VIDEO

SCROLL FOR NEXT