DRDO Job Google
naukri-job-news

DRDO Job: DRDO मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी; 'या' पदांसाठी निघाली भरती; पात्रता अन् अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

DRDO Recruitment 2024: डीआरडीओमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. डीआरडीओमध्ये विविध पदांसाठी भरती केली जात आहे.

Siddhi Hande

डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. डिफेंस रिसर्च अँड डेव्लपमेंटमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. डीआरडीओमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

डीआरडीओमध्ये रिसर्च असोसिएट आणि ज्युनिअर रिसर्च फेलो पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑफसाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.ही भरती दोन वर्षाच्या कंत्राटी पदासाठी भरती केली जाणार आहे.

रिसर्च असोसिएट पदासाठी उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक्स/CSE/सॉफ्टवेअर इंजिनियर / आयटी/ मेकॅनिकल / फिजिक्स या विषयात पदवी प्राप्त केलेली असावी.ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी विविध विषयातील पदवीधरांसाठी विविध जागा रिक्त आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर, केमिकल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, फिजिक्स या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्ष आहे. रिसर्च फेलो पदासाठी वयोमर्यादा २८ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. या नोकरसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.हेड एचआरडी, डॉ.एपीजे अब्दुल कलाम, मिसाईल कॉम्प्लेक्स, रिसर्च सेंटर, हैदराबाद, तेलंगणा 500 069 येथे अर्ज पाठवायचा आहे.

ऑइल इंडियामध्ये नोकरीची संधी

सध्या ऑइल इंडियामध्येही नोकरीची संधी आहे.मॅकेनिक (एसी आणि आर), असोसिएट इंजिनियर (इलेक्ट्रिकल) पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ४० रिक्त पदांवर ही भरतीप्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार या नोकरीसाठीही अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT