Delhi Metro Job Saam Tv
naukri-job-news

Delhi Metro Job: दिल्ली मेट्रोत मॅनेजर होण्याची संधी; महिना ८७००० रुपये पगार, पात्रता काय? जाणून घ्या

Delhi Metro Recruitment 2024: दिल्ली मेट्रोत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. मॅनेजर पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

दिल्ली मेट्रोत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी उमेदवारांनी delhimetro.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. दिल्ली मेट्रोत मॅनेजर, असिस्ंटट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (Delhi Metro Job)

दिल्ली मेट्रोत मॅनेजर होण्याची ही सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०२४ आहे. मॅनेजर (भूमि), असिस्टंट मॅनेजर पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यालयातील बी.बी.ई/ बी.टेक (सिविल) डिग्री असणे गरजेचे आहे. या डिग्रीसाठी ६० टक्के गुण प्राप्त केलेले असावे. (Delhi Metro Recruitment 2024)

दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी ५५ वर्ष ते ६२ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. मॅनेजर पदासाठी ८७,८०० रुपये पगार मिळणार आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी ६८,३०० रुपये पगार मिळणार आहे.

दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.त्यानंतर मेडिकल फिटनेस परीक्षा द्यावी लागणार आहे. या नोकरीसाठी मुलाखत डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी दिल्ली मेट्रोच्या साइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करावा. त्यानंतर हा अर्ज भरुन जनरल मॅनेजर, प्रोजेक्ट (एचआर), दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, भारखंभा, नवी दिल्ली येथे अर्ज पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT