CISF Bharti Saam Tv
naukri-job-news

CISF Recruitment: १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; CISF मध्ये भरती सुरु; पगार ८११०० रुपये, अर्ज कसा करावा?

CISF Recruitment 2025: १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. CISF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. केंद्रिय ओद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच सीआयएसएफ (CISF) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. CISFने भरती जाहीर केली आहे. सीआयएसएफने हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (CISF Recruitment)

या नोकरीबाबत CISF च्या अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. सीआयएसएफमध्ये ३० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. (CISF Recruitment 2025)

CISF मधील या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही. सीआयएसएफमधील या नोकरीसाठी १८ ते २३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. त्यापेक्षा जास्त वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करु नयेत.

सीआयएसएफमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२वी पास असणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्हाला लेव्हल ४ नुसार २५००० ते ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत.

सीआयएसएफमधील या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना महत्त्वाची माहिती भरायची आहे. त्याचसोबत कागदपत्रे अपलोड करायचे आहे.

१२वी पास तरुणांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे. सरकारी विभागात काम करायची संधी तुम्हाला मिळणार आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. सीआयएसएफमधील या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT