Government Job Saam Tv
naukri-job-news

CID Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; CID मध्ये भरती सुरु; आजच अर्ज करा

CID Recruitment 2025: सीआयडीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सीआयडीमध्ये सध्या होमगार्ड पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सीआयडीमध्ये म्हणजेच क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सीआयडीने होमगार्ड पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

सीआयडीमधील होमगार्ड पदासाठी अर्जप्रक्रिया १ मेपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला सविस्तर माहिती अधिसूचनेत मिळेल.

क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटने होमगार्ड कॅटेगरी बी टेक्निकल आणि इतर ट्रेड्समध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी पास असणे गरजेचे आहे.याचसोबत उमेदवाराला कॉम्प्युटरचे ज्ञान असावे. उमेदवार हा मानसिक आणि शारिरिकरित्या फिट असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी १८ ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. महिला व पुरुष दोघांसाठीही ही भरती जाहीर करण्यात आली आहे. पुरुष उमेदवारांची उंची १६० सेमी असावी. तर महिला उमेदवारांची उंची १५० सेमी असावी.

या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. यासाठी तुम्हाला फॉर्म, १०,१२वीचे मार्कशीट, शैक्षणिक प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, कॉम्प्युटर सर्टिफिकेट, पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे.

सीआयडीमधील होमगार्ड पदासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. तुमची निवड शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी आणि स्कील टेस्टद्वारे केली जाणार आहे.या नोकरीसाठी दर दिवशी ७१० रुपयाप्रमाणे पगार दिला जाणार आहे. ही भरती आंध्र प्रदेश सीआयडीसाठी केली जाणार आहे.

या नोकरीसाठीचा अर्ज तुम्हाला डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस, सीआयडी, एपी पोलिस हेडक्वार्टर, मंगलगिरी ५२२५०३ येथे पाठवायचा आहे. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर https://cid.appolice.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT