Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Central Railway Recruitment : मध्य रेल्वेत २,४२४ पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू, दहावी पास उमेदवार करू शकतात अर्ज; जाणून घ्या सविस्तर

Central Railway Recruitment For Apprentice Post: मध्य रेल्वेत १०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. २,४२४ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जर तुमचेही रेल्वेत नोकरी करायचे स्वप्न असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. मध्य रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मध्य रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मुख्य प्रकल्प व्यवस्थापकाद्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

केंद्र सरकारअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. रेल्वेत एकूण २४२४ पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. १०वी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

अप्रेंटिस म्हणजेच शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती जाहीर केली आहे. १५ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. १-२ वर्षांच्या कालावधीसाठी ही रिक्त पदे भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. अधिकृत वेबसाइटवर सर्व माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हाला अर्ज भरताना कोणतीही अडचण आली तर तुम्ही act.apprentice@rrccr.com यावर ईमेल करा. या नोकरीसाठी तुम्ही १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात.

जर तुमचे शिक्षण पूर्ण झाले असेल किंवा तुम्ही आयटीआयचे शिक्षण घेत असाल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीत तुम्हाला रेल्वेची संपूर्ण माहिती मिळणार आहे. रेल्वेत कशा प्रकारे काम केले जाते, हे सर्व या तुम्हाला या कालावधीत शिकायला मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना पगार किती दिला जाणार आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT