BOB Recruitment Saam Tv
naukri-job-news

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी; पगार १ लाख २० हजार रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Bank of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहेत. चीफ मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी

मॅनेजर, चीफ मॅनेजर पदांसाठी भरती

मिळणार भरघोस पगार

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चांगल्या सरकारी बँकेत मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये सध्या भरती निघाली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्जप्रक्रियादेखील सुरु झाली आहे.

बँक ऑफ बडोदाने नोकरीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जाची प्रोसेस १० ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही bankofbaroda.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

बँक ऑफ बडोदातील ही भरती कॉर्पोरेट अँड इन्स्टिट्यूशनल क्रेडिट विभागात रेग्युलर बेसवर होणार आहे. या पदांसाठी ५० जागा रिक्त आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २५ ते ४२ वयोगटातील असावे. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही आधी अधिसूचना वाचा.

या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ६४,८२० ते १,२०,९४० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्ट, सायकोमॅट्रिक टेस्टद्वारे केली जाणार आहे. यानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशनसाठी बोलावले जाईल. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन/पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा फायनान्समध्ये स्पेशलायझेशन केलेले असावे. किंवा CA/CMA/CS/CFA डिग्री प्राप्त केलेली असावी. बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची ही संधी आहे. त्यामुळे जर तुम्ही या पात्रतेत बसत असाल तर लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT