BMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

BMC Recruitment: बृहन्मुंबई महापालिकेअंतर्गत नोकरीची संधी; या पदांसाठी होणार भरती; आजच अर्ज करा

BMC Recruitment 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्माईल काउन्सिल व बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत इन्क्युबेशन मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नागरी तंत्रज्ञानावरवर आधारित इनक्युबेशन सेंटर आहे. या सेंटरमध्ये भरती केली जाणार आहे.यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संचालक, स्माईल काउन्सिल व बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (BMC Recruitment)

स्माईल काउन्सिल आणि बृहन्मुंबईत महानगरपालिकेद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.इन्क्युबेशन मॅनेजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाल मेलद्वारे तुमचा अर्ज पाठवायचा आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अंभियांत्रिकी, अर्थशास्त्र किंवा कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत उद्योजकता, मार्केटिंग, स्पेशलायझेशनमध्ये एमबीएला प्राधान्य देण्यात येईल. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ३ ते ५ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. एका रिक्त जागेवर ही भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठीचे ठिकाण अंधेरी किंवा वरळी मुंबई येथे असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला अर्ज, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचे प्रमाणपत्र ई-मेलवर पाठवायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे मुलाखतीची तारीख तुम्हाला सांगितली जाईल.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२५ आहे. हा अर्ज तुम्हाला info.smile@mcgm.gov.in वर पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये जल्लोष

Maratha Protest: मराठा बांधवांचा जल्लोष; पाटील बोलते सबको को** | VIDEO

Manoj Jarange Full Name: मनोज जरांगे याचं पूर्ण नाव काय आहे?

Reem Shaikh: वेस्टर्न आउटफिटमधील रीम शेखचे सुंदर लूक, तुम्ही पण करु शकता रिक्रिएट

Accident : टायर फुटल्याने पोलीस कारचा भीषण अपघात; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT